धोब्याचे गाढव - मराठी गोष्ट
एके दिवशी दुपारी धोबी आपल्या गाढवासोबत धोबी घाटावर कपडे धुण्यासाठी जात होता. उन्हाचा कडाका होता आणि उष्णतेमुळे दोघांचेही हाल होत होते. उन्हामुळे तसेच कपड्यांचे वजन यामुळे गाढवाला चालणे कठीण होत होते. दोघेही घाटाकडे जात असताना अचानक गाढवाचा पाय अडखळल्याने तो खोल खड्ड्यात पडला.
आपले गाढव खड्ड्यात पडल्याचे पाहून धोबी घाबरला आणि त्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. म्हातारा आणि अशक्त असूनही, गाढवाने खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली, पण गाढव आणि धोबी दोघेही अयशस्वी ठरले. धोबी एवढ्या मेहनतीने काम करत असल्याचे पाहून काही गावकरी त्याच्या मदतीसाठी पोहोचले, मात्र त्यांना पण गाढवाला खड्ड्यातून बाहेर काढता आले नाही.
तेव्हा गावकऱ्यांनी धोबीला सांगितले की, गाढव आता म्हातारे झाले आहे, त्यामुळे खड्ड्यात माती टाकून इथेच गाडण्यातच शहाणपण आहे. थोडा नकार दिल्यानंतर धोबीनेही याला होकार दिला. गावकऱ्यांनी फावड्याच्या सहाय्याने खड्ड्यात माती टाकण्यास सुरुवात केली. आपले काय होत आहे हे गाढवाला समजताच तो खूप दुःखी झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गाढव थोडा वेळ ओरडला पण काही वेळाने तो शांत झाला.
अचानक धोब्याने पाहिले की गाढव एक विचित्र कृत्य करत आहे. गावकऱ्यांनी त्यावर माती टाकताच तो त्याच्या अंगातील माती खड्ड्यात टाकून तो त्या मातीच्या वर चढत आहे. असे सतत केल्याने मातीने खड्डा भरत राहिला आणि गाढव त्यावर चढून वर आले. आपल्या गाढवाची ही हुशारी पाहून धोबीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्याने गाढवाला मिठी मारली. यानंतर धोबी गाढवाची खूप काळजी घेवू लागला.
तात्पर्य : अत्यंत कठीण परिस्थितीतही तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून अडचणींवर मात करू शकता.
जर तुम्हाला धोब्याचे गाढव ही मराठी गोष्ट आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा. आम्ही अश्याच प्रकारच्या छान छान गोष्टी, बोध कथा, मजेशीर गोष्टी या साईट वर अपलोड करत असतो. गोष्ट आवडली असेल तर नक्की कमेंट करा.