बेडकांची स्वारी मराठी गोष्ट | Snake and Frogs Story in Marathi

बेडकांची स्वारी मराठी गोष्ट | Snake and Frogs Marathi Story 

बेडकांची स्वारी मराठी गोष्ट | Snake and Frogs Story in Marathi

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलामध्ये एक मोठा साप राहत होता. म्हातारपणामुळे त्याला आपली शिकार सहजासहजी सापडत नव्हती. भुकेने तो दिवसेंदिवस व्याकूळ होत चालला होता. एके दिवशी त्याला एक कल्पना सुचली. तो बेडकांनी भरलेल्या एका तलावाजवळ पोहोचला. तिथे तो उदास होऊन एका दगडावर बसला. तेवढ्यात जवळच्या दगडावर बसलेल्या बेडकाने त्याला पाहिले. थोड्या वेळाने बेडकाने सापाला विचारले, "सापदादा, काय झालंय, आज तुम्ही अन्न शोधत नाही. अन्न गोळा करत नाही." हे ऐकून सापाने रडका चेहरा बनवून बेडकाला त्याची गोष्ट सांगितली.

साप म्हणाला, “मी आज अन्नाच्या शोधात बेडकाच्या मागे जात होतो. अचानक बेडूक जाऊन ब्राह्मणांच्या टोळीमध्ये लपला. बेडूक पकडण्याच्या प्रयत्नात मी चुकून एका ब्राह्मणाच्या मुलीला चावा घेतला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे रागावलेल्या ब्राह्मणाने मला शाप दिला. त्याने मला शाप दिला आणि म्हणाला की, "पोट भरण्यासाठी तुला बेडकांची स्वारी बनावी लागेल". म्हणूनच मी बेडकांची स्वारी होण्यासाठी या तलावाजवळ आलो आहे. हे ऐकून बेडूक ताबडतोब तलावाच्या आत गेला आणि त्याने त्याच्या राजाला सर्व हकीकत सांगितली. हे गोष्ट ऐकून राजाला आश्चर्य वाटले, सुरुवातीला त्याचा अजिबात विश्वास बसला नाही, पण थोडा वेळ विचार करून बेडकांचा राजा तलावातून बाहेर आला आणि उडी मारून सापाच्या फनावर जाऊन बसला. राजाला हे करताना पाहून इतर बेडकांनीही तसेच केले.

सापाला समजले की बेडूक अजूनही माझी परीक्षा घेत आहेत. म्हणून साप सुद्धा प्रत्येकाला त्याच्या अंगावर उडी मारून विचलित न होता आरामात फिरू देत होता. यानंतर बेडकांचा राजा म्हणाला, "मला सापावर स्वार होण्यात जितकी मजा आली तितकी कधीच मला कधीच आली नाही." बेडकांचा विश्वास जिंकल्यानंतर आता हळूहळू साप रोज बेडकांची स्वारी होऊ लागला.

काही दिवसांनी हुशार सापाने त्याचा वेग थोडा कमी केला. हे पाहून बेडकांचा राजा विचारले, "हे! तुझा वेग इतका हळू का आहे?" त्याला उत्तर देताना साप म्हणाला, "ब्राह्मणाच्या शापामुळे मी म्हातारा आणि बराच काळ उपाशी आहे. त्यामुळे माझा वेग कमी झाला आहे." हे ऐकून राजा म्हणाला की आम्ही तुला रोज एक बेडकाची शिकार देत जाऊ. तुम्ही दररोज एक बेडूक खात जा. हे ऐकून सापाला मनातून खूप आनंद झाला. तो म्हणाला, “राजन, मला ब्राह्मणाचा शाप आहे. मी बेडूक खाऊ शकत नाही, पण तुम्ही म्हणाल तर मी तयार आहे." हे करत असताना तो रोज एक बेडूक खाऊ लागला आणि तो एकदम तंदुरुस्त झाला.

साप आणि बेडकांची गोष्ट | Snake and Frogs Story in Marathi

साप आणि बेडकांची गोष्ट | Snake and Frogs Story in Marathi

आता कोणतेही कष्ट न करता सापाला रोज भक्ष्य मिळत होते. सापाला खूप आनंद झाला. बेडकांना अजूनही सापाची चाल समजली नव्हती. बेडकांच्या राजालाही सापाच्या या कारस्थानाची कल्पना नव्हती. हळूहळू सगळे बेडूक कमी होवू लागले. असे करता करता एके दिवशी सापाने बेडकांच्या राजालाही खाऊन टाकले आणि तलावात राहणाऱ्या सर्व बेडकांचा नाश केला.

तात्पर्य : कोणत्याही शत्रूवर विश्वास ठेवू नका. त्याने स्वतःचे आणि आपल्याच लोकांचे नुकसान होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने